• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राष्ट्रीय बुध्दीबळ अजिंक्यपद स्पर्धा जळगावात रंगणार

सचिव नंदलाल गादिया, समन्वयक अरविंद देशपांडे, अनिल जोशी यांची माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
राष्ट्रीय बुध्दीबळ अजिंक्यपद स्पर्धा जळगावात रंगणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स ॲकॅडमी येत्या ८ ते १३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत शहरातील कांताई सभागृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी सचिव नंदलाल गादिया, समन्वयक अरविंद देशपांडे, अनिल जोशी, रविंद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे यांच्यासह सदस्य आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आली आहे. भारतातील अग्रगण्य मोबाईल प्रिमीयर लिग फाउंडेशन (एम पी एल) व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (अर्थात साई) या संस्था अखिल भारतीय बुध्दीबळ महासंघाशी करारबध्द असून देशभरातील सर्व स्पर्धांसाठी त्यांचे बहुमोल सहकार्य असते. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले आहे.
या स्पर्धेचा डामडौल काही अनोखाच असतो. भारतभरातील नावाजलेले दहा पुरूष व महिला ग्रँडमास्टर, 13 आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेच्यामार्फत चार अधिक एक राखीव अशा पद्धतीने संघ या स्पर्धेसाठी राज्याचे संघ पाठविले जातात. या प्रत्येक संघासोबत त्यांचा संघ व्यवस्थापक देखील स्पर्धेतील पूर्ण कालावधी दरम्यान राहत असल्याने स्पर्धेतील संघाबाबताचे असंख्य बारकावे ते आयोजकांसमवेत हाताळत असतात.
पुरुष गटामध्ये एल आय सी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आर एस पी बी टीम, तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे. तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघ देखील स्पर्धेत सहभागी असेल.
राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जळगावमध्ये आयोजीत होत असल्याने जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांतून खेळले जाणारे डाव अतिशय चुरशीचे व उत्कंठावर्धक असतील यात शंका नाही. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी ९० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद वाढीव वेळ राहणार आहे. अशा दिग्गज खेळाडूंचे डाव अनुभवायची संधी या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम बुद्धिबळ प्रेमींना मिळणार आहे. ही राष्ट्रीय बुध्दीबळ सांघिक स्पर्धा जळगाव येथील प्रेसिडेंट कॉटेज, अजिंठा रोड या रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा सांघिक स्विस पद्धतीने खेळविली जाणार असून ग्रँडमास्टर विसाख, दीपण चक्रवर्ती, स्वप्नील धोपाडे,तेजकुमार, आर आर लक्ष्मण, श्रीराम झा, आंतरराष्ट्रीय मास्टर विघ्नेश, श्याम निखिल, अर्घ्यादिप दास, सी आर जी कृष्णा, सायंतन दास, दिनेश शर्मा पुरुष गटात तर महिला गटात, महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, किरण मनीषा मोहंती, मेरी गोम्स, दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामिनाथन, पद्मिनी राऊत, ईशा करवडे, निशा मोहोता, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर प्रणाली धारिया साक्षी चीतलांगे, तेजस्विनी सागर, महिला फिडे मास्टर बोमिनी मोनिका अक्षया, तोषाली, महिला कँडिडेत मास्टर वैष्णवी आदी खेळाडू सहभागी आहेत.
तब्बल १० लाखाची बक्षिसांची रक्कम विजेत्या संघांना प्राप्त होणार असुन पुरुष व महिला गटात समसमान अशी ५ लाखांची रोख बक्षिसे वितरीत केली जातील. या व्यतिरिक्त स्पर्धेअंती प्रत्येक पटावरील सर्वात जास्त गुण कमावणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
भारतभरातील बुद्धिबळ प्रेमींच्या खास आग्रहास्तव स्पर्धेतील प्रमुख पट लाईव्ह करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला असून त्या द्वारे घरबसल्या भारतभरातील कुठल्याही राज्यातून हे पटावरील महायुद्ध बुद्धिबळ प्रेमींना अनुभवास येणार आहे. या अशा अधिकृत स्पर्धेतील तांत्रिक बाजू देखील अतिशय भक्कम असणे गरजेचे असते. त्याची जबाबदारी आखिल बुद्धिबळ महासंघ आर्बिटर कमिशनचे प्रमुख धर्मेंद्र कुमार यांनी मुख्य पंच म्हणून स्वीकारलेली आहे.
स्पर्धा आयोजन समितीचे चेअरमन श्री.अशोकभाऊ जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव नंदलाल गादिया यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, अनिल जोशी, रविंद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, विवेक आळवणी व जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे सदस्य आदी उपस्थित होते.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group