
जळगाव मिरर | १३ मे २०२३
गेल्या काही दिवसापासून कर्नाटक विधानसभा निवडणूक विजयी होण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली होती पण आज या निवडणुकीचा निकाल काही प्रमाणात लागला आहे. यात कॉंग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि मतमोजणीमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार दुपारी १२ वाजता घराच्या बाल्कनीत आले, त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला आणि कार्यकर्त्यांसमोर हात जोडले. मीडियामध्ये पोहोचल्यावर ते भावुक झाले. ते म्हणाले- सोनिया गांधी त्यांना तुरुंगात भेटायला आल्या होत्या, मी त्यांना विजयाचे आश्वासन दिले होते. एक वाजण्याच्या सुमारास भाजपने पराभव स्वीकारला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुढे आले आणि म्हणाले – निकालांचे विश्लेषण करू, पक्ष लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करेल.
राहुल गांधी दुपारी अडीच वाजता दिल्लीत माध्यमांसमोर हजर झाले. मीडियाला 6 वेळा नमस्ते केले आणि 2 मिनिटांचा वेळ मागितला. मग म्हणाले- आम्ही द्वेषाने लढलो नाही. देशावर प्रेम असल्याचे कर्नाटकने दाखवून दिले आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या अनेक बड्या चेहऱ्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते. काँग्रेसचे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार, भाजपचे बसवराज बोम्मई हे प्रमुख चेहरे होते. या तिघांनीही निवडणुका जिंकल्या. काँग्रेस अध्यक्षपदी असलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठीही ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक होती. एकतर्फी विजयामुळे पक्षातील त्यांचा दर्जा वाढणार आहे.
राहुल गांधी भिजले अन विजयी पटकावला
काँग्रेसची भारत जोडो यात्रा २५ व्या दिवशी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी म्हैसूरमध्ये मुसळधार पावसात जाहीर सभेला संबोधित केले. या सभेला उपस्थित शेकडो कार्यकर्ते पावसात भिजत राहुल गांधींना ऐकत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या सभेचा व्हिडिओ राहुल गांधींनी ट्विटरवरती शेअर केला होता. त्याच या सभेमुळे कर्नाटकात विजयी झाला असावा असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहे.






















