जळगाव : प्रतिनिधी
नवजीवन शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेतर्फे ११ एप्रिल रोजी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचा कार्यक्रम राजाराम मंगल कार्यालय इंद्रप्रस्थ नगर येथे संपन्न झाला. हा सोहळा जिल्हा स्तरावर घेण्यात आला असून या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या गावांहून तेरा बटूंची उपस्थिती लाभली.
नवजीवन शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २०२० मध्ये झाली असून, समाज हितासाठी अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले आहेत. यात परशुराम जयंती, covid-19 मध्ये गरजूंना मदत, किराणा वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटप आदी कामांचा समावेश आहे. सदर संस्थेचे सात लोकांचे कार्यकारी मंडळ असून संजय लक्ष्मण जोशी, कुणाल जितेंद्र अत्रे, आनंद सुधाकर जोशी, विवेक प्रकाश जोशी, दीपक गजानन काळे, देवा दिगंबर काळे, केतन संजय काळे या सर्व कार्यकारणी मंडळाने विविध कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहेत. समाज हितासाठी पुढेही कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही यावेळी कार्यकारणींनी सांगितले.




















