जळगाव : प्रतिनिधी
जळगाव पाचोरा रस्त्यावर असलेल्या जैन व्हॅली परिसरात तिन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघे जण जबर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव पाचोरा रस्त्यावर असलेल्या जैन व्हॅली परिसरात तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला असून यामधील तीन गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात मारुती सुझुकी कंपनीची इको कार (एमएच 12 टीएच 2295), रिक्षा (एमएच 19 व्ही 5583) आणि एक मोटार सायकल अपघातग्रस्त झाले आहेत. रामेश्वर कॉलनीतील चेतन रघुनाथ भावसार, मेहरूनमधील विजय मधुकर चौधरी तर शनीपेठेतील शेख अय्याज शेख शाहूद्दिन हे या अपघातात जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तिघा जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात झाला यावेळी येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी मदत करत त्या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.




















