जळगाव : प्रतिनिधी
डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे आज राष्ट्रीय डॉजबॉल पंच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव नरसिंमहा रेड्डी, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव डॉ हनुमंत लुंगे, राष्ट्रीय पंच पॅनल प्रमुख सुकुमार मुरगन (तामिळनाडू), डॉ राममेहेर सिंग (हरियाणा), डॉ शिवकुमारन (कर्नाटक) समनव्यक डॉ हरिश काळे, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांची उपस्थिती होती जळगाव जिल्ह्यातून गिरीश पाटील, निलेश पाटील, सचिन महाजन व योगेश सोनवणे हे सहभागी झाले होते.




















