जळगाव: प्रतिनिधी
शहरातील टॉवर चौकात शहर पोलीस स्टेशनच्या समोरील फुले मार्केट येथे एका साडीच्या दुकानाला आग ११ ते ११.३० वाजे दरम्यान लागल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शहर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुले मार्केट मधील पांचाली साडी सेंटर या दुकानाला भीषण आग ११ वाजे दरम्यान लागली. आग लागल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना समजतात त्यांनी लागलीच शहर पोलीस स्थानकातील कर्मचारी यांना कळवले. त्यानंतर महानगरपालिकेचे अग्निशमन बंब तत्काळ पोहोचले. व आग विझवण्यात नियंत्रण मिळवले. त्यानंतर दुकानाचे मालक आल्यानंतर दुकान उघडून सविस्तर पाहणी केली. उशिरापर्यंत शहर पोलीस स्थानकात कुठलीही आगीची नोंद नव्हती.




















