जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून दुचाकी चार चाकी व बस चा अपघात नियमित प्रमाणे सुरू असून दुपारच्या सुमारास महामार्गावर ट्रक व बस मध्ये झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव – भुसावळ महामार्ग नजीक असलेल्या चांडक कॅन्सर हॉस्पिटल समोर दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी च्या सुमारास जळगाव शहरात येण्यासाठी मुक्ताईनगर येथून बस निघाली होती यावेळी शहरातील महामार्ग नजीक असलेल्या चांडक कॅन्सर रुग्णालया नजीक बस असताना बसच्या पुढे भरदव ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने बस ट्रक वर जाऊन धडकली या धडकेत चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे तर बस चालकाने एमआयडीसी पोलीस स्थानक गाठत ट्रक चालक एम एच 40 सीएम 75 41 वरील चालक कमलेश संत बहादुर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोहे को विजय पाटील हे करीत आहे





















