जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
देशात गेल्या काही वर्षापासून सातत्याने पेट्रोल व डीझेलच्या दरात चढ तर उतार दिसून येत असते. नियमितपणे देशात सकाळी पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत हे नागरिकांसाठी जाहीर करण्यात येतात. कधी हे दर काही प्रमाणावर कमी होतात तर काही प्रमाणावर ते वाढतात. अश्यावेळी आज म्हणजेच ५ ऑकटोबर रोजी देशातील पेट्रोल डिझेलचे दर समोर आले आहे. देशातील काही शहरांमध्ये ते वाढले आहेत तर काही ठिकाणी ते कमी झाले आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलचे दर हे १०६.३१ आहेत. डिझेलचे दर हे ९४.२७ आहेत. तर पुण्यात आज पेट्रोल ३३ पैश्यांनी स्वस्त झाले आहे. आणि डिझेल ३२ पैश्यांनी स्वस्त झाले आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर १०५.८४ रुपये इतका आहे तर डिझेलचा दर ९२.३६ इतका आहे.
जागतिक बाजारात कच्या तेलाचे दर आज वाढले आहेत. तेलाच्या किमतीत ०.१२ टाक्यांनी वाढ झाली आहे. WTI म्हणजेच डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलची किंमत $84.32 प्रति बॅरल इतकी झाली आहे.
देशाच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर हे ९६.७२ इतके आहे. तर डिझेलचे दर हे ८९.६२ इतके आहेत. देशाच्या दक्षिणेकडे म्हणजेच चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर हे १०२.७७ इतके आहेत तर डिझेलचे दर हे ९२.७६इकडे आहेत. कोलकत्ता मध्ये पेट्रोलचे दर १०६.०३ इतके आहेत तर डिझेलचे दर हे ९२.७६ इतके आहेत.