जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील एका शाळेच्या परिसरातून १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आता जळगाव शहरातील सर्वच पालकांना सावधान राहण्याची गरज सध्या जळगावात निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका मोठ्या महाविद्यालयाच्या परिसरातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय ८ महिने व दुसरी मुलगी १४ वर्ष ३ महिने अशा दोन मुलीना दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी शाळा सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने दोन्ही मुलीना काही तरी फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय.रोहिदास गभाले हे करीत आहेत.