• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हाधिकाऱ्यांचे लोकशाही उत्सवाचे निमंत्रण : जळगाव शहरात 1लाख 30 हजार घरात पोहचले निमंत्रण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2024
in जळगाव
0
जिल्हाधिकाऱ्यांचे लोकशाही उत्सवाचे निमंत्रण : जळगाव शहरात 1लाख 30 हजार घरात पोहचले निमंत्रण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मे २०२४

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका निमंत्रण पत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.आज पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 2 लाख 20 हजार घरापर्यंत तर जळगाव शहरात 1लाख 30 हजार घरापर्यंत पोहचले निमंत्रण.

ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील नगरपालिका, नगरपरिषद व महानगर पालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या पत्येक मालमत्ता धारकांपर्यंत हे पत्र मोबाईल तसेच ईमेल च्या माध्यमातून पोहचविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील जळगांव व रावेर या दोन्ही मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विविध कारणामुळे मतदानाची घसरत चाललेली टक्केवारी हा चिंतेचा विषय होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे, यासाठी स्वीप या उपक्रमाच्या माध्यमातून जळगांव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सोबतच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये यासाठी मतदान केंद्रावर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. उन्हाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जेष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग नागरिक तसेच, गरोदर महिला, नवं बाळंत महिला यांचेसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यात मतदारांना अडचण येऊ नये यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

जळगांव शहर महानगर पालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या प्रत्येक मालमत्ता धारकांच्या मोबाईल क्रमांकावर टेक्स्ट मेसेज च्या माध्यमातून या पत्राची लिंक पोहचवण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात चावडी चावडी वर हे पत्र लावण्यात आले आहे.

उस्फुर्त प्रतिसाद
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने नागरिक आणि मतदारांशी थेट पत्राच्या माध्यमातून तेही अगदी सोप्या व सहज भाषेत संवाद साधून मतदानासाठी आवाहन करीत संवाद साधल्याने या पत्रा विषयी नागरिकांमध्ये उत्स्फूर्त भावना आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी या पत्राचे चावडी चावडी वर सामूहिक वाचन करण्यात येत आहे. पत्राच्या माध्यमातून प्रशासन ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचल्याचे समाधानही नागरिक व्यक्त करीत आहेत.

पूर्वीच्या काळात संवादाची आणि दळण वळणाची साधने कमी होती त्यावेळी परिवारातील नोकरी, उद्योग किंवा अन्य कामी बाहेर असलेले सदस्य संवाद साधण्यासाठी पत्राचा वापर करीत होते. या पत्रातील भाषा आपल्या लोकांना समजेल अशी असायची त्याच बाबी लक्षात घेऊन आपला माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधतं आहे. हाच दृष्टिकोन ठेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदानाचा टक्का वाढवा यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देखील शहरी व ग्रामीण भागातील मतदारांना आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचा दृष्टीने हा पत्र प्रपंच केला आहे.या पत्राच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आपला व्हाट्स ऍप क्रमांक देखील जाहीर केला असून या क्रमांकाच्या माध्यमातून त्या पत्राचे जाहीर वाचन करून जाहीर वाचनाचा व्हिडीओ व्हाट्सअँप वर पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता पर्यंत दोन हजार जणांनी व्हिडीओ, टेक्स्ट मेसेज केले आहेत. त्याचा मोठा ओघ सुरु असून जिल्हा निवडणूक अधिकारी वेळ मिळेल तसे मेसेजला रिप्लाय देत आहेत.

Tags: collector aayusha PrasadLoksabha elections

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group