जळगाव मिरर | १२ जुलै २०२४
शहरातील विद्युत कॉलनी परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने डाव्या हाताला चाकू मारून नंतर पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि. ११ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. घटनेप्रमाणे रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दुहिता संजयकुमार मोरे (वय २५, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती ती आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होती. नुकतेच बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ती घरीच होती. दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे आते भावाशी लग्न ठरले होते. त्याचा दोन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. या मृत्यूमुळे दुहिता मोरे ही खूप दुःखी झाली होती. त्यामुळे ती सारखी तणावात राहायची. याच तणावातून तिने राहत्या घरी डाव्या हाताला चाकू मारून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांना घटना समजताच त्यांनी तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.