जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२४
पारोळा तालुक्यातील शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी गणेशोत्सवनिमित्त भंडारा देण्यात आला. त्यातून शाळेतील ७० विद्यार्थी व चार शिक्षकांना विषबाधा झाली. त्यापैकी दोन विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. दुपारी ४.०० वाजेनंतर सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली. यात १२ ते १५ वयोगटातील एकूण ७० विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्याथ्यर्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. त्यामुळे काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली.