जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
शहरातील राहत्या घरात गळफास घेत इरफान शेख सुलतान (वय ३५, रा. फुकटपुरा तांबापूर) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापूरा परिसरातील फुटपुरा भागात इरफान शेख सुलतान हा तरुण वास्तव्यास होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरी कोणीही नसतांना इरफान शेख याने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना उघडकीस येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर इरफान शेख याला मयत घोषीत केले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.