
जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२४
शहरातील सागर नगरात तरुणाचे बंद घर फोडून घरातून ५७ हजार २४७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ३ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी, दुपारी २ वाजता शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर नगरातील पाण्याच्या टाकीजवळ देवीदास अनिलकुमार पैठणे (वय ३२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ५७ हजार २४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेले. ही घटना १५ सप्टेंबर रोज सकाळी ११ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी मंगळवारी शनिपेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे





















