जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२४
जळगाव शहर विधानसभेची निवडणूक आता 5 दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सर्व उमेदवारांमध्ये प्रचाराच्या माध्यमातून चुरस बघायला मिळत आहे. प्रत्येक उमेदवार नागरिकांसमोर आपण केलल्या विकास कामांचा आढावा देत आहे. अशा परिस्थितीत वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार इंजिनियर ललितकुमार रामकिशोर घोगले यांचा देखील जोरदार प्रचार सुरु आहे.
ललित घोगले एक तरुण चेहरा असून, सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल शहरातील अजिंठा चौफुली येथे असलेल्या अजिंठा हौसिंग सोसायटी येथे ललित घोगले यांनी होम टू होम प्रचार केला. यावेळी येथील सर्व बौद्ध समाज बांधवानी एक ही मत येथून पांगणार नाही अशी ग्वाही देत ललित घोगले यांचे स्वागत केले.
यावेळी महिला भगिनींनी औक्षण करीत आशीर्वाद दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, दिगंबर सोनवणे, सुजाता ठाकूर, मनोज अडकमोल, राहुल सुरवाडे, अतुल पवार, सागर केदार, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.