जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रावेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या बारा वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारातून त्या मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात संशयित करण प्रकाश भिल (वय २१, रा. बिलवाडी, ता. रावेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बलवाडी येथे राहणारा संशयित करण प्रकाश भिल याने पीडित मुलीला काहीतरी आमिष दाखवत फुस लाऊन पळून नेले होते.
ही घटना दि. १ डिसेंबर २०२३ रोजी घडली होती. तेव्हापासून पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना देखील तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. ही घटना उघडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून संशयित करण प्रकाश भिल याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. हरिदास बोचरे हे करीत आहे.