
जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२५
पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथे सुटीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरुन मृत्यू झाल्याची घटना दि. २४ रोजी घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सैनिक रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८) असे मयत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
मिलाल्लेया माहितीनुसार, भडगाव येथून जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा येथील रहिवासी व आसाम रायफल शिलॉग येथे नोकरीस होता. हा जवान दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शेतात फेरफटका मारायला गेला असता त्याचा विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे चुलत भाऊ गोपाल पाटील हा सकाळी ११ वाजता शेतात गेला असता विहिरीजवळ चप्पल, रुमाल दिसल्याने रविंद्र पाटील हा विहिरीच्या पाण्यात पडला असावा असा संशय त्याला आला. याबाबत घटनेची माहिती गावात पोहोचताच नातेवाईकांसह नागरिकांनी घटनेस्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पाचोरा येथील हुसेन शेख यांना बोलवण्यात आले. त्यांनी विहिरीच्या पाण्यातून रविद्र पाटील यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. जवानाला भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ पंकज जाधव यांनी तपामन मयत घोषित केले.




















