जळगाव मिरर | १० जुलै २०२५
शहरातील भुसावळ नॅशनल हायवेवरील चांडक हॉस्पिटलसमोर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कामील शहा रहीम शहा (वय ३०, रा. तांबापुरा) हा तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापुरा परिसरातील कामील शहा रहीम शहा हा तरुण (एमएच १९, डीवाय ६४६३) क्रमांकाच्या दुचाकीने मित्रासोबत भुसावळ नॅशनल हायवेवरुन जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या (युपी १७, एच ११६९) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने तंना जोरात धडक दिली. या अपघातात कामील शहा व त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान कामील शहा याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.
