• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

जिल्हाधिकारी रोहन घुगे हस्ते नटराज पूजन : ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 26, 2025
in Uncategorized
0
जिल्हाधिकारी रोहन घुगे हस्ते नटराज पूजन : ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५ 

राज्यातील हौशी नाट्य कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणा-या ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे व मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन, श्रीफळ वाढवून व नाट्यपरंपरेप्रमाणे घंटानाद करत झाले.

उदघाटन सोहळ्याप्रसंगी रंगमंचावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासमवेत चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या कोषाध्यक्षा डॉ.शमा सराफ, हास्यजत्रा फेम रंगकर्मी हेमंत पाटील, तसेच झी५ वरील बाई तुझ्या पायी या वेबसिरीजमध्ये अभिनय करणारे जळगावचे रंगकर्मी अनिल मोरे, चेतन कुमावत यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक व समन्वयक प्रा.संदीप तायडे आदी उपस्थित होते. नटराज पूजन, श्रीफळ वाढवल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घंटानाद करुन नाट्य स्पर्धेचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी शहरातील रंगकर्मींचे कौतुक करण्यासह शहरातील जैन उद्योग समूहाचेही आभार मानले. या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले तर आभार सहसमन्वयक नितीन तायडे यांनी मानले.

पहिल्या दिवशी रंगले दानव
पहिल्या दिवशी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांनी मानवी स्वभावातील दृष्ट प्रवृत्ती, गूढता आणि संघर्षाचा शोध घेणारे गुढ नाटक दानव ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाले. अतुल साळवे लिखीत व प्रवीण मोरे दिग्दर्शित या नाटकाने येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात शुभारंभ झाला. राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नाटकाचा गूढ प्रवास रंगवत स्पर्धेची सुरुवात केली.

भयावह जंगलातील मोडकळीस आलेल्या घरात अडकलेल्या दोन प्रवाशांवर आधारलेली ही कहाणी मानवी स्वभावातील दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिबिंब दाखवत हळूहळू गुढ उलगडत जाते. मुख्य पात्र चांडाली आणि भैरव यांच्यातून मानवी दुहतेचा आणि सत्याचा संघर्ष या नाटकाने उभा राहतो. गूढ घटनांच्या मालिकेनंतर अखेरीस चांडाली पोलीस अधिकारी असल्याचा धक्कादायक खुलासा प्रेक्षकांना विचारमग्न करणारा होता.

तांत्रिक बाजूत प्रकाशयोजनाकार अतुल ब-हाटे यांनी गुढतेचे वातावरण सजीव केले. पार्श्वसंगीतकार मोहित कांबळे यांनी प्रसंगांला भेदक परिणामकारता देण्याचा प्रयत्न केला. नेपथ्यकार रोशन वाघ उभे केलेले नेपथ्य नाटकाचा गाभा होता. गूढतेच्या माध्यमातून मानवी स्वभावाचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न केलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना रंगवले. नाट्य रंगण्यासाठी पूरक रंगभूषा व वेशभूषा काजल वाघ व ज्योती चंद्रमोरे यांनी केली होती. दानव नाट्यात दीपनगर येथील प्रविण मोरे (भैरव), शनाया (ऐश्वर्या खोसे), चांडाली (शुभम गुडा), आत्मा (सपना तिवारी), पाशा (रोशन वाघ), अथर्व (महेश होनमाने) यांनी अभिनय साकारला होता. तांत्रिक बाजूंनी खुललेल्या गुढ नाट्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

Related Posts

मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !
Uncategorized

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात !

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group