
जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२६
कुटुंबीय गावातील यात्रेत गेलेले असताना घरी कोणीही नसताना ममुराबाद (ता. जळगाव) येथील भिकन किसन पाटील (वय ५५) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गावात बारागाड्यानिमित्त यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे पाटील यांच्या घरातील सर्व सदस्य यात्रेत गेले होते. त्या वेळी घरी एकटे असताना ही दुर्दैवी घटना घडली. पत्नी व मुले घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तत्काळ पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.




















