• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव मालवाहूची दुचाकीला समोरासमोर धडक; तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2026
in क्राईम, जळगाव
0
भरधाव मालवाहूची दुचाकीला समोरासमोर धडक; तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२६ 

शेतात पाणी भरण्यासाठी दुचाकीने निघालेल्या तरुण शेतकऱ्याला भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील नेवरा मारोती मंदिराजवळ घडली. अपघातानंतर चालक वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून वाहन पकडले; मात्र चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील जगदीश अशोक पाटील (वय ३७) हे शेती व्यवसाय करत होते. शनिवारी रात्री ते पाचोरा रस्त्यावरील शेतात पाणी भरण्यासाठी (एमएच १९, ईयू ११६५) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. शिरसोलीकडून वावडद्याकडे जात असताना नेवरा मारुती मंदिराजवळ पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा मालवाहू वाहनाने (एमएच २०, ईजी ६५२९) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, जगदीश पाटील रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मालवाहू वाहन चालकाने वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून नायरा पेट्रोल पंपाजवळ वाहन अडवले. चालकाने वाहन जागीच सोडून पसार होण्यात यश मिळवले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत जगदीश पाटील यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. याप्रकरणी अनिल वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group