• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विरवाडा–चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विरवाडा–चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६

चोपडा  तालुक्यातील विरवाडा येथून चोपडा येथे धार्मिक कार्यक्रमाला चारचाकी वाहनाने जाताना वाहनाला अपघात झाला. या वाहनात असलेल्या राहुल भोई व मयूर राजपूत या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना १६ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडा गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विरवाडा येथील राहुल अमृत भोई (वय ३१) व मयूर अरुण राजपूत (वय १९) हे या अपघातात ठार झाले आहेत. तसेच विजय अमृत भोई (वय ३५), बंटी रवींद्र कोळी (वय १९) व राकेश भगवान राजपूत (वय ३५) हे जखमी झाले आहेत. हे पाचही जण इर्टीगा या चारचाकी वाहना (एमएच- १९, बीएस- १००८) ने चोपडा येथे होत असल्या धार्मिक कार्यक्रमासाठी विरवाड्याहून चोपड्याकडे १६ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास निघाले होते. चोपड्याकडे येत असताना आडगाव व चोपडादरम्यान चालक मयूर भोई याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या अपघातात राहुल अमृत भोई व मयूर अरुण राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय अमृत भोई हा गंभीर जखमी झाल्याने त्याला चोपड्याहून जळगाव येथे हलवण्यात आले. तर जखमी बंटी रवींद्र कोळी व राकेश भगवान राजपूत यांच्यावर चोपड्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातची माहिती मिळताच विरवाडे येथील सरपंच विशाल म्हाळके, माजी पं.स. सभापती आत्माराम म्हाळके व ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. तर, ही माहिती मिळताच पो. नि. मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयत मयूर राजपूत यांच्यावर दुपारी ३ वाजता तर राहुल भोई यांच्यावर दुपारी ४.३० वाजता विरवाडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा समावेश असून त्यातील राहुल अमृत भोई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर विजय अमृत भोई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडा येथील भोई परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मयत राहुल अमृत भोई, मयूर अरुण राजपूत तसेच जखमी विजय अमृत भोई, बंटी रवींद्र कोळी, राकेश भगवान राजपूत हे पाचही जण प्रवासी रिक्षा चालवून आपला उदारनिर्वाह करत असल्याचे सांगण्यात आले. यात चोपडा येथे धार्मिक कार्यक्रमात त्यांची वाहने भाड्याने दिली होती. अपघातच्या आदल्या दिवशी घरी जाताना त्यांनी आपली वाहने चोपड्यातच ठेऊन एटिंगा गाडी घेऊन ते विरवाडे येथे गेले होते. तर सकाळी पुन्हा चोपडा येथे याच गाडीने परत येत असतांना हा अपघात झाला आणि त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group