
जळगाव मिरर | संदीप महाले
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरातील अनेक कानाकोपऱ्यात शासकीय भांडी योजना मिळवून देण्यासाठी एक सुशिक्षित टोळी सक्रिय झाली असून ते भांडी योजनेच्या अर्जापासून ते कार्ड आणून देण्यापर्यंत सर्वच कामे करून देत असतात. सर्व सामान्य गृहिणींना शासकीय योजनेचे भले मोठे आमिष देऊन आधी अर्ज भरून घेणे सोबत एक हजार रुपये तर कार्ड देण्याची दिनांक भेटल्यावर ५०० रुपये घेण्यासाठी हक्काने घरी येत असतात व आम्ही तुमचे काम करून दिले. म्हणजे गृहिणीला विश्वास देत असतात. मात्र हीच प्रोसेस करण्यासाठी एकाद्या सायबर कॅफेत गेल्यास केवळ ३०० ते ४०० रुपयाला महागात महाग होणार अन्यथा या पेक्षा कमी पैसे लागतील. या पद्धतीने जळगाव शहरातील अनेक नागरिकांची सुशिक्षित पद्धतीने लूट होत असून या महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी काही महत्वाचे कार्ड देखील आपल्याकडे असल्याचे ते सांगत असतात.
योजना कामगारांची अन लाभ सर्वांचाच !
शासनाने राज्यातील पोटावर हात असणाऱ्या कामगारांसाठी योजना काढली असली तरी सध्या जळगाव शहरातील लाखो महिलांनी लाडक्या बहिणी सारखा लाभ या भांडी योजनेत घेतला आहे. अनेकांना हि योजना माहिती नसते मात्र या योजनेचे कार्ड बनवून देणारे दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने या योजनेचा लाभ गोर गरिबांना नसून पात्र नसल्याने महिला देखील या योजनेचा लाभ घेत असताना दिसून येत आहे.
योजना शासनाची अन कमाई मात्र दलालांची !
राज्यातील सरकारने जनतेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून त्यांची अमलबजावणी देखील सुरु आहे. मात्र या भांडी योजनेत सर्व काही शासनाचे मात्र कमाई दलाल मोठ्या पद्धतीने करीत आहे. तर नुकतेच जळगाव शहरात एका महिलेने चक्क १०० रुपयांची लाच घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. तर दलालांची कुठलीही मागणी गोरगरीब महिला पूर्ण करून या योजनेचा लाभ घेत आहे. जर महिलांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना पैसे द्यावे लागत असतील तर यापेक्षा दुर्देव काय !





















