
जळगाव मिरर | २१ जून २०२६

सद्या देशात , राज्यात स्मार्ट मीटर व प्रीपेड मीटर चा मोठ्या प्रमाणात गाजावाजा सुरू आहे. त्यात सरकार ठामपणे काहीही निर्णय जाहीर करायला पुढे येत नाही. मात्र काही खाजगी कंपनी मार्फत मीटर बसविणे सक्ती सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आहे. जनतेची कोणतीही तक्रार तथा अर्ज नसताना देखील जबरदस्ती ने ग्राहकाची कोणतीही परवानगी न घेता हुकूमशाही पद्धतीने स्मार्ट मीटर बसविणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यात देशात व राज्यात स्मार्ट मीटर बाबत वाढीव वीजबिल बाबतच्या तक्रारी , अडचणी व लूट सुरू असल्याचे सोशल मीडियावर देखील व्हिडिओ व्हायरल होत असल्याने जनतेत तीव्र नाराजी व चिड निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यात १७ जून २०२६ पासून ४८ तासाच्या आत आपले घरगुत पोस्टपेड मीटर काढून स्मार्ट मीटर सक्तीने बसविले जाणार असल्याचे मेसेज नोंदणीकृत मोबाईल वर येत आहेत. त्यामुळे जनतेत आक्रोश निर्माण होत आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने महावितरण कंपनीला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे की यानंतर कोणत्याही ग्राहकाला शासकीय यंत्रणेमार्फत स्मार्ट मीटर बसविणे सक्ती करण्यात येऊ नये. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे चा शॉक महावितरण ला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा निर्वाणीचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील , तालुका उपाध्यक्ष नाना शिंदे , आशुतोष पाटील, अरुण भोसले महाराज ,गोविंदा बनकर , नानाभाऊ गावंडे , वाल्मीक कोळी , किशोर बडगुजर , देवा कोळी , जगदीश कुरकुरे , सागर जोशी , सोनू राजपूत , विजय चिखलीकर , संदीप मराठे , रतन देशमुख , आदी उपस्थित होते.





















