जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२६
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून त्यास गंभीर जखमी केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मेहुण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार फत्तेपूर येथील सुभाषनगर भागातील रहिवासी प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) याने वडगाव सद्दो येथील अभिषेक संतोष मोरे या तरुणाच्या बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून अभिषेक मोरे याच्या मनात प्रशांत चौधरी याच्याविषयी सूडाची भावना होती. दरम्यान, २७ जुलैला सायंकाळी त्याने प्रशांतला त्याच्याच दुचाकीवर बसवून तोरनाळे जंगल परिसरात नेले. तेथे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात अभिषेकने प्रशांतच्या डोक्यात दगड घातला. तर त्याचा मृत्यू झाला, असे समजून त्याच्या अंगावर झाडाचा पाला टाकून व त्याचीच दुचाकी घेऊन तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याला रात्रीच अभिषेकला अटक केली.
तर, त्याने पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर त्याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी प्रशांत चौधरी मरनासन्न अवस्थेत दिसला. त्याला तत्काळ जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते.
तेथे मेंदूविकार तज्ज्ञ नसल्याने त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान ३१ जुलैला प्रशांत चौधरी यांना मृत्यू झाला. तर या प्रकरणात संशयित अभिषेक मोरे हा पोलिस कोठडीत असून त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अभिषेकच्या नातेवाईकांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तपास स.पो.नि. अंकुश जाधव व पोलीस कर्मचारी करत आहेत.




















