• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 14, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२६

साडूच्या वडीलांचे निधन झाल्याचे सांगत वैजयंती गणपत माळी (वय ८५, रा. करंजी, ता. पारोळा) या वृद्ध महिलेचा तीने मुलगा मानलेल्या बहिणीच्या मुलाने अपहरण करुन खून केला. त्यानंतर मृतदेह महामार्गालगत असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त चारीत विल्हेवाट लावली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून सुमारे चाळीस दिवस सलग या गुन्ह्याचा तपास करीत संशयित प्रशांत उत्तम माळी (वय ४०, रा. मुकटी, ता. धुळे) याच्या मुसक्या आवळून या गुन्ह्याचा उलगडा केला.

आपत्य नसल्याने पतीचे निधन झाल्यानंतर एकट्या राहत असलेल्या वैजयंताबाई माळी दि. ३ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाल्या. वृद्धेच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने असल्याने त्यांचा घातपात संशय बळावल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी चार उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना केली. पहिल्या पथकाने संशयिताचा शोध घेण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी पारोळा, दळवेल, मुकटी, फागणे, धुळे व चाळीसगाव याठिकाणी संशयिताचा शोध घेतला, तर दुसऱ्या पथकावर बेपत्ता महिलेचा शोध घ्यायचा असल्याने त्यांनी सुमारे अडीचशे किमीचा प्रवास करीत तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला.

पोलिसांनी वैजयंताबाई माळी बेपत्ता झाल्या त्या दिवशीचे सुमारे दीडशे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये वृद्धेने मुलगा मानलेला भाचा प्रशांत माळी हा अंगणात तिच्यासोबत बोलतांना दिसला. त्यानंतर वृद्ध महिला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून ती कार पारोळ्याच्या दिशेने जातांना दिसल्यानंतर पोलिसांना प्रशांतवर संशय बळावला. तसेच तो देखील गेल्या अनेक दिवसांपासून मिळून येत नसल्याने पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. चाळीस दिवसानंतर पोलिसांनी संशयित प्रशांत माळी याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याला खाक्या दाखविताच त्याने त्याच्यावर असलेल्या कर्जामुळे आई समान असलेल्या मावशीचा तिच्याजवळील दागिन्यांसाठी रुमालाने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. मावशीच्या अंगावरील दागिने त्याने धरणगाव, अमळनेर व धुळे येथे विकले तर काही दागिने फागणे येथे लाविल्याचे पोलिसांना सांगितले असून पोलिस मुद्देमाल जप्त करत आहे

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे संतोष पवार, पोहेकॉ हिरालाल पाटील, विलेश सोनवणे, सलीत तडवी, राहुल बैसाने, विलास गायकवाड, राहुल कोळी, गोपाळ पाटील, मयुर निकम, बाबासाहेब पाटील, महेश सोमवंशी, रिझवान शेख, तांत्रिक विश्लेषण मिलींद जाधव, गौरव पाटील तर पारोळा पो. स्टे.चे निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक अमोल दुफळे, सुनिल हटकर, अनिल राठोड, सतिष पाटील, चेरसिंग मेहेर यांच्या पथकाने केली

शिरसोली येथे नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचे सांगत वैजयंताबाई यांना प्रशांत माळीने (एमएच १९, बीजे ००७१) क्रमांकाच्या कारमध्य बसवले. दिवसभर त्यांना धरणगाव, अमळनेर, धुळेया मार्गावर फिरवल्यानंतर मावशीकडे दागिन्यांची मागणी केली. मात्र त्यांनी दागिने देण्यास नकार दिल्याने मध्यरात्री दीड वाजता रागाच्या भरात गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून तो घरी जावून झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने मृतदेहाची विल्टेवाट लावण्याकरीता दिवसभर फिरत होता, मात्र सायंकाळच्या सुमारास त्याने कानळदा फाट्याजवळील सर्व्हिस रोड लगत असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त चारीत फेकून देत विल्हेवाट लावली.

संशयिताने विल्हेवाट लावलेल्या ठिकाणावरील सिमेंटच्या चारीतून पोलिसांनी मानवी सांगाडा मिळून आला. पोलिसांनी तो सांगाडा ताब्यात घेत तो जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, चाळीस दिवसांपासून सुरु असलेल्या घटनेचा उडलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

Related Posts

भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group