जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२६
पैशांची मागणी करत पत्नीला मद्यपी पतीने मारहाण केली. पोलिसात तक्रार दिल्यास धावत्या रेल्वेतून तुला फेकुन देईल, बंदुकीने गोळी मारेल, असे धमकाविले. या जाचाला वैतागलेल्या पत्नीने पोलिसात जात पतीची कैफियत मांडली. या प्रकरणी पतीसह एका महिलेने विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय विवाहिता मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिचा पती मद्यपान करतो. मंगळवारी सकाळी नऊ वाजता मद्यप्राशन केलेला पती त्याच्या पत्नीला म्हणाला, घरात राहायचे असेल तर तु स्वतः कमाई करुन मला पैसे आणून दे. तरच मी तुला माझ्या घरात ठेवेल. आणि तु जर पैसे कमवुन आणुन देणार नाही, तर मी तुला घरात ठेवणार नाही. दाम्पत्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पतीने पीडित पन ीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली. पुन्हा पती पीडितेला म्हणाला, तुला या घरात असेल राहायचे तर तु जर पैसे कममवून आणून देणार नाही तर मी तुला घरात ठेवणार नाही.
माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर मी तुला चालत्या ट्रेनमधुन फेकुन देईल. चाकु मारेल. नाही तर बंदुकीने गोळी मारेल असे धमकाविले. या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसांत जावुन तक्रार दिली. या प्रकरणी तपास हवालदार प्रकाश पाटील हे करीत आहेत.




















