जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२६
शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याची, तर एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, रायसोनी नगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अचानक बेपत्ता झाला. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या घटनेत, पिंप्राळा भागातून एक १९ वर्षीय मुलगी दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दि. ७ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















