• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६

राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची आणि आपुलकीची नाती जपण्याचे एक वेगळे उदाहरण चाळीसगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील १५०० हून अधिक आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंशी भावा-बहिणीचे अनोखे नाते निर्माण केले आहे. दरवर्षी भाऊबीजेच्या निमित्ताने या सर्व भगिनींचा सन्मान करून त्यांना साडीची भेट देण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे. या नात्याचा एक भावनिक प्रसंग नुकताच लोजे आंबेहोळ येथे अनुभवायला मिळाला.

आमदार मंगेश चव्हाण हे तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासकामे, सामाजिक उपक्रम किंवा अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने जात असतात. अशा वेळी त्या-त्या गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई आपल्या हक्काच्या भावाचे मोठ्या आपुलकीने स्वागत करतात. भाऊबीजेपुरते मर्यादित न राहता वर्षभर जपले जाणारे हे नाते आता एका मोठ्या कुटुंबाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नुकतेच लोजे आंबेहोळ येथे आयोजित भाऊबीज सोहळ्यानिमित्त आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थिती लावली. यावेळी गावातील आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी त्यांनी अगदी कौटुंबिक वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर आपल्या बहिणीच्या घरी आलेला हक्काचा भाऊ म्हणून त्यांनी स्वीकारलेला हा पाहुणचार उपस्थितांसाठी विशेष भावनिक क्षण ठरला.

यावेळी अंगणवाडी सेविका संगीताबाई राठोड, भारती पाटील, आशा वर्कर अनिता राठोड, मदतनीस सुनिता पाटील तसेच गावच्या सरपंच वैशाली संदीप राठोड यांच्यासह इतर भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनी आमदार चव्हाण यांचे आपुलकीने स्वागत केले.

बहिणींनी दिलेले प्रेम हीच आयुष्यातील खरी कमाई – आमदार मंगेश चव्हाण

“चाळीसगाव तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई या माझ्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेचा भाग नाहीत, तर माझ्या हक्काच्या बहिणी आहेत. दरवर्षी भाऊबीजेला मी त्यांना साडीची भेट देतो; मात्र या बहिणी मला जे भरभरून प्रेम, माया आणि आशीर्वाद देतात, त्याची परतफेड कोणत्याही भेटवस्तूने होऊ शकत नाही. तालुक्यातील कोणत्याही गावात गेल्यानंतर माझी बहीण माझी वाट पाहत असते, ही भावनाच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. हे नाते पदाचे किंवा राजकारणाचे नसून मायेचे, विश्वासाचे आणि आयुष्यभर जपण्याचे आहे,” अशा भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

भाऊबीजेच्या साडी भेटीतून जुळले हजारो बहिणींचे ऋणानुबंध

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई या ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, माता-बालसंगोपन आणि सामाजिक जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न आमदार चव्हाण यांनी या उपक्रमातून केला आहे. दरवर्षी भाऊबीजेला दिली जाणारी साडी ही केवळ भेटवस्तू न राहता भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचे प्रतीक बनली आहे.

लोजे आंबेहोळ येथील कमलताई पवार यांच्या घरी झालेल्या या कौटुंबिक भेटीमुळे या अनोख्या नात्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. एका बाजूला हजारो बहिणींच्या पाठीशी उभा राहणारा भाऊ आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावावर मायेचा वर्षाव करणाऱ्या बहिणी, असे भावनिक चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दिवाळीसाठी माहेरी आली, पण परतलीच नाही : भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू !

November 13, 2026
भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!
क्राईम

भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

November 13, 2026
रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!
क्राईम

रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

November 13, 2026
गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !
क्राईम

गांजाच्या शेतीचा पर्दाफाश : ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त; संशयित आरोपी फरार !

November 11, 2026
मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !
क्राईम

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

November 11, 2026
जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !
क्राईम

जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

November 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

November 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दिवाळीसाठी माहेरी आली, पण परतलीच नाही : भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू !

November 13, 2026
भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

November 13, 2026
रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

November 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group