जळगाव मिरर | १९ नोव्हेंबर २०२६
पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील रहिवासी बाळू प्रकाश पाटील (वय २८) यांनी १६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेमुळे बाळद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिलोलेल्या माहितीनुसार, बाळद बुद्रुक येथील रहिवासी बाळु पाटील यांनी १६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही माहिती कुटुंबीयांना कळताच त्यांनी व गावातील पोलिस पाटील नितीन पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र सोमवंशी यांनी तातडीने नगरदेवळा पोलीस ठाणे व पाचोरा पोलिसांना माहिती दिली. पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, पठाण व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, बाळू पाटील यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पाचोरा पोलीस तपास करत आहेत. मयत बाळू पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे बाळद बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.





















