जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२६
सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे अमिष दाखवत जळगावातील ३० वर्षीय महिलेवर कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाने अत्याचार केला. सन २०२० ते २०२५ या दरम्यान तो जळगावात महिलेसोबत राहत असतांना घडला. अत्याचारातून तीन वर्षांपुवी मुलगी झाली आहे. तरुण गावी निघून जात असल्यामुळे त्याने लग्नास नकार दिला. त्यावरून रोहन सुनील गारुंगे (रा. इचलकरंजीत, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध दि. २० नोव्हेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील ३० वर्षीय महिलेची रोहन गारुंगे याच्याशी सन २०२० मध्ये फेसबुकद्वारे ओळख झाली. त्यानंतर मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. संशयित रोहन गारुंगे हा तरुण महिलेला भेटण्यासाठी जळगावात आला आणि त्याने आपण अविवाहित असल्याचे त्याने सांगत लग्नाचे अमिष दाखविले. तेव्हापासून म्हणजेच सन २०२० पासून ते २०२५ पर्यंत तो महिलेच्या घरी तिच्यासोबत राहिला. त्यादरम्यान त्याने महिलेवर पाच वर्ष अत्याचार केला. त्यातून महिला गर्भवती होवून तीने सन २०२३ मध्ये मुलीला जन्म दिला असून ती सद्या तीन वर्षांची आहे.
मुलगी तीन वर्षाची झालेली असतांना महिलेने गारुंगे याला लग्नाविषयी विचारणा केली, मात्र तो नेहमी वेगवेगळे कारणे देत गावी निघून गेला होता. महिलेने अधिक चौकशी केली असता सदर तरुणाचे लग्न झाल्याचे व त्याला मुले असल्याचे समजले. महिलेने लग्नासाठी तरुणाशी वारंवार संपर्क साधून विचारणा केली. त्यानंतर त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. या प्रकरणी महिलेने दि. २० नोव्हेंबर रोजी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहन गारुंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय तडवी करत आहेत.





















