जळगाव : प्रतिनिधी
शहरातील बी.जे. मार्केट परिसरात दुचाकी वॉशिंग करताना २० वर्षीय तौफिक अफजल भिस्ती या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी तौफिक हा परिवारा सोबत राहतो. त्याचे वडील मिस्तरी काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. तौफिक हा लहानपणापासून बी.जे. मार्केट परिसरातील एका वॉशिंग सेंटरवर काम करुन वडीलांना हातभार लावत होता. शुक्रवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास तौफिक हा आपल्या इतर तीन सहकार्यांसोबत नेहमीप्रमाणे दुचाकी वॉशिंग करीत होता. यावेळी त्याला विजेचा शॉक लागल्याने तो जमिनीवर कोळसला. काही मित्रांनी व मालक आसिफ भिस्ती यांनी त्याला दुचाकीवरुन तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
