
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडे सात (७.३०) गुगलचा मोठा इव्हेंट होत आहे. त्यामध्ये Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro ला आज लाँच केले जाणार आहे. कंपनीचा Made By Google सुरू करण्यात येणार आहे. गुगलच्या या इव्हेंट मध्ये अनेक प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत. या इव्हेंट मध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि अन्य दुसरे प्रोडक्ट्स सुद्धा लाँच केले जाणार आहेत. यावरून कंपनीने आधी टीज केलेले आहे. Google Pixel 6 सीरीजचे पुढील व्हर्जन म्हणून Google Pixel 7 सीरीजला आणले जाणार आहे. या स्मार्टफोन सीरीजला भारतात सुद्धा लाँच केले जाणार आहे.
ऑनलाइन पाहू शकता Made By Google इव्हेंट
कंपनीने या इव्हेंटमध्ये लाँच होणाऱ्या प्रोडक्ट्सची माहिती शेअर केली आहे. इव्हेंट दरम्यान Google Pixel 7, Pixel 7 Pro आणि Google Pixel Watch ला लाँच केले जाणार आहे. याशिवाय, कंपनी नेस्ट स्मार्ट होम पोर्टफोलियोला वाढवणार आहे. कंपनी गुगल पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रोला प्री ऑर्डरसाठी उपलब्ध करणार आहे. याला प्री बुक केल्यानंतर अनेक ऑफर्स मिळणार आहे. याची संभावित स्पेसिफिकेशन्स सुद्धा लीक झाली आहेत.
Google Pixel 7, Pixel 7 Pro चे संभावित स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro वरून एक रिपोर्ट नुकतीच लीक झाली होती. ज्यात स्पेसिफिकेशन्स होती. रिपोर्टनुसार, पिक्सेल ७ प्रो मध्ये ६.७ इंचाचा एलटीपीओ स्क्रीन १२० एचझेड रिफ्रेश रेट दिली जावू शकते. तर गुगल पिक्सेल ७ मध्ये ६.३ इंचाची स्क्रीन ९० एचझेड रिफ्रेश रेट दिली जावू शकते. दोन्ही फोन्समध्ये वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस साठी आयपी ६८ रेटिंग दिली जावू शकते. हा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. गुगल पिक्सेल ७ मध्ये ८ जीबी पर्यंत रॅम ऑप्शन दिला जावू शकतो. तर प्रो व्हर्जन मध्ये १२ जीबी पर्यंत रॅम ऑप्शन दिला जावू शकतो.






















