जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२५
छत्रपती संभाजीनगरच्या बाळापुर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय पवन शांतीकुमार राठोड शाळा सुटल्यानंतर घराकडे न जात, रस्त्यावर हवेत उडणारा एक कटलेला पतंग पकडण्यासाठी धावत गेला. मात्र, पतंगाच्या दिशेने धावत असताना त्याचे लक्ष न लागल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडला. या दुर्दैवी अपघातात पवनचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मकर संक्रांती सण जवळ येत असताना, पतंग उडवण्याचा उत्साह वेगाने वाढतो. परंतु, या काळात अनेक अपघात देखील घडतात. बाळापुर परिसरातील या दुर्दैवी घटनेने परिसरातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली आहे.