जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या किरण रमेश शिंपी (वय २२, रा. शिंधी, ता. भडगाव) या तरुणाने खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील शिंधी येथे वास्तव्यास असलेला किरण शिंदी हा तरुण आई भाऊ आणि वहिनीसोबत वास्तस्तव्यास होता. गेल्या अडीच वर्षांपासून तो जळगाव एमआयडीसीतील एका ठिंबक कंपनीत त्यांचा मित्रा रवी मघाळे यांच्यासोबत कामाला होता. त्यामुळे तो जळगावातील रामेश्वर कॉलनीत खोली करुन राहत होता. रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याचे मित्र रवीशी बोलणे झाले होते. त्यानंतर त्याने राहत्या खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी घर मालकीन यांनी घरात डोकावून पाहिले असता त्याने किरण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.