
जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२४
जळगाव तालुक्यातील बिलवाडी शिवारातील निबांच्या झाडाला गळफास घेवून विशाल रघुनाथ पाटील (वय २७, रा. बिलवाडी, ता. जळगाव) या तरुणाने आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बिलवाडी येथे राहणारा विशाल पाटील या तरुणाने दि. १० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेचया सुमारास गाव शिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांचे नातेवाईक विजय पाटील यांनी तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत तरुणाला मयत घोषीत केले. तरुणाच्या आत्म्हत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाळके हे करीत आहे.