जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२४
यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील २८ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरातील स्वंयपाक खोलीमध्ये गळफास घेतल्याचा प्रकार पतीच्या निदर्शनास येताच त्याने विळ्याने दोर कापला. तातडीने त्यांना ग्रामीण रूगणालय नेले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ही घटना शनिवार घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव बुद्रुक येथील रहिवाशी नीलिमा संजय कोळी (वय २८) ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. दरम्यान, तिने आपल्या घरातील स्वयंपाक घरात दोर बांधून गळफास घेतला. हा प्रकार त्यांचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली आणि विळ्याने तो दोर कापला. दोर कापल्यानंतर महिला जमिनीवर कोसळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर तातडीने त्यांना तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून या महिलेला मृत घोषित केले. याप्रकरणी संजय कोळी यांच्या माहितीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात स.पो. नि. विनोदकुमार गोसावी, पो. उ.नि. सुनील मोरे करत आहेत. मयत महिलेच्या पश्चात पती, २ मुले, मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमु गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.