जळगाव मिरर | १० जून २०२५
यावल तालुक्यातील शिरसाड येथे ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात बेडशीटच्या साह्याने गळफ ास घेतला. ही घटना सोमवारी उडकीस आली. त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील शिरसाड येथील रहिवाशी नीलेश सुधाकर सोनवणे (वय ३६) तरुण आपल्या घरी होता. दरम्यान त्याने आपल्या घरात लाकडी आड्याला बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
यावल ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसांना रवींद्र सोनवणे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सोनवणे करीत आहे.





















