जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२३
एका ५२ वर्षीय इसमाने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केलायची घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी जळगाव ते म्हसावद दरम्यान घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील श्री समर्थ कॉलनीत कैलास दत्तात्रय कडभाने (वय ५२) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून बुधवारी जळगाव ते म्हसावद डाऊन रेल्वेलाइनवर खांब क्रमांक ४०६/१७ ते ४०६/१९ दरम्यान धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपविली. मृताच्या खिशात सापडलेल्या कागदपत्र व मोबाइलवरून त्याची ओळख पटली. त्यानंतर घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ. गुलाब माळी, अनिल मोरे, संजय भालेराव, दिनेश पाटील, प्रकाश चिंचोले यांनी घटनास्थळी धाव घेतली.