जळगाव मिरर । १४ जानेवारी २०२३ ।
शहरातील एका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीचा मोठा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळील रहिवासी रणजीत भीमराव निकम यांच्या निवासस्थानी दि ११ ते १३ जानेवारी रोजीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाटाचे लॉकर तोडून चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. या प्रकरणी रणजीत निकम यांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ भंडारकर हे करीत आहेत.