जळगाव मिरर | २७ जून २०२३
राजकीय पदाधिकाऱ्याबाबत इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी येथील समर्थ क्लासेसचे संचालक दीपक पाटील (२५, रा. बोंडेवाडा, सावदा) यांच्याविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना संन्यास यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पाटील यांनी समाजमाध्यमावर ही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यानंतर रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील काही लोकांनी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आपल्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानंतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. एम. शिंदे, डॉ. कुणाल सोनवणे, सपोनि नीलेश वाघ, जालिंदर पळे यांच्यासह दंगा नियंत्रण पथक, जळगाव व सावदा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.