जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२३
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून वाढत असलेली गुन्हेगारी कुठल्याही परिस्थितीत नियंत्रणात येत नाही आहे. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. चक्क वर्गमित्राने घरात येऊन काही फोटो काढले. नंतर हे फोटो डीलीट करण्यासाठी तिला ब्लॅकमेल करून एक लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या वर्गमित्रावर खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संग्राम संजय चव्हाण (वय २५, रा. एकंबे, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी २३ वर्षांची असून, संग्राम आणि ती एकाच वर्गात शहरातील एका महाविद्यालयात शिकत आहेत. एके दिवशी तरुणीच्या घरी येऊन लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीचे काही फोटो काढले. त्यानंतर तिला तो ब्लॅकमेल करू लागला. एवढ्यावरच न थांबता त्याने फेक आयडीवरून मेसेज करून फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. फोटो डीलीट करण्याच्या बदल्यात एक लाख रुपये रक्कम व माझ्यासोबत ये, अशी मागणी करू लागला. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणीचे म्हणणे आहे की, संग्राम चव्हाण हा गेल्या दोन वर्षांपासून त्रास देता होता. ऑगस्ट २०२१ मध्ये त्याने तिला अनेकदा ब्लॅकमेल केले. त्यानंतर २० ऑगस्ट २०१३ रोजी फेक आयडीवरून त्याने फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.