
जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२५
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसताना आता पुन्हा एकदा चौथीतील विद्यार्थिनीशी सलग दोन दिवस छेडछाड केल्याची घटना जालना तालुक्यातील मौजपूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडली. प्रल्हाद सोनुने असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संशयित शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांकडे सोपवले.
सविस्तर वृत्त असे कि, पीडित मुलगी ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी शाळेत गेली होती. सर्व मुले मैदानात खेळत असताना शिक्षक सोनुने यांनी तिला रुममध्ये बोलावू न घेत तिच्याशी झोंबाझोंबी केली. कुणाला सांगितले तर तुला खूप मारेल, अशी धमकी दिली.घाबरलेली मुलगी रडतच घरी गेली.
मामी आणि आजीने विचारल्यानंतरतिने घडलेली घटना सांगितली.मुलीच्या नातेवाईकांनी ही घटना गावातील सरपंच, उपसरपंच आणि केंद्रप्रमुखांना सांगितली. त्यानंतरगावात बैठक बोलावण्यात आली.शिक्षकाला बोलावून विचारणा केलीअसता तो अरेरावी करू लागला.संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकालाशाळेतच चोप दिला. पोलिस वेळेतपोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.कायदा हातात घेऊ नका,संशयिताला योग्य शिक्षा होईल, असे पोलिसांनी बजावल्यानंतर ग्रामस्थशांत झाले. मौजपूरी पोलिसांना बोलावून संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.