जळगाव मिरर | १७ मे २०२३
राज्याचे वैद्यकिय शिक्षण ग्रामविकास व पंचायती राज, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नगरसेवक डॉ.विरण सुरेश खडके व रंजना विजय वानखेडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
शहरातील अयोध्या नगर परिसरातील रायसोनी शाळेत आज सकाळी १० वाजेपासून भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रभागातील शेकडो नागरिकांनी लाभ घेवून आरोग्य तपासणी करून घेतली आहे. या शिबिराचे उद्घाटन आ.राजुमामा भोळे, दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते झाले यावेळी विशाल ञीपाटी, महेश चोधरी, डाॅ.विरन खडके, प्रदीप रोटे, राजु घुगे पाटील,धनंजय पाटील, अमीत काळे, बंटी भारंबे, अनिल जोशी, धनजय पाटील, संतोष इंगळे, किसन मराठे, योगेश निंबाळकर, अनिल चौधरी, शैलेंद्र खडसे, वैभव पाटील, भैय्या चौधरी, हर्षल इंगळे, बाळा सोनवणे, विजय दिक्षीत, एकनाथ भावसार, गौरव पाटील, प्रवीण वाणी, केशव पाटील, ललीत चौधरी, अनिकेत मराठे, मंगलसिंग परदेशी, विशाल चौधरी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आहे. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार देखील मानले आहे.