जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ ।
जगभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या धूम धडाक्यात साजरी होत असते. जळगाव जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येत असते. दरवर्षा प्रमाणे यंदाही शिव जयंती निमित्ताने शहरातील दादावाडी परिसरातील रामराज्य ग्रुपच्या वतीने ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषात भव्य दुचाकी रैलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील दादावाडी परिसरातील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रामराज्य ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दादावाडी चौकातून भव्य दुचाकी रैलीचे उदघाटन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी यांच्याहस्ते होणार आहे. तरी या दुचाकी रैलीस शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष नितीन जाधव, प्रवीण पाटील, परितोष बोरनारे, प्रशुम भोळे, देवेश बीरपण, अक्षय जाधव, शेखर पाटील, हितेश बागुल, निलेश पाटील, रोहन सोनवणे, राकेश विचुरकर, ललित सोनार, शुभम पाटील, करन राठोड, संदीप सोनवणे यांच्यासह आदींनी केले आहे.