जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२४
पुणे जिल्ह्यातील बावधन जवळ हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ऑगस्टा १०९ असे बावधन जवळ दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे नाव आहे.
या अपघातात दोन पायलट आणि एका विमान देखभाल अभियंत्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी नव्हते. हेलिकॉप्टरमध्ये २ पायलट आणि एक अभियंता होता. सर्व तीन क्रू मेंबर्सची यात जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत हे पायलट होते. ही प्राथमिक माहिती असून त्याची पुष्टी केली जात आहे,” असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
एका व्हिडीओमध्ये पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचे दिसत आहे. यानंतर त्या हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे झाले. या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरले होते. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमने यासंदर्भात माहिती दिली आहे. दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आधी धुक्यामध्ये अडकले होते. त्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर ते खाली कोसळले. पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली. यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे.