अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी अमळनेर शहरातील एका महाविद्यालयात गेलेली असतांना तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याची घटना दिनांक १४ रोजी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जवखेडा येथील १६ वर्षीय मुलगी अमळनेर येथील खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत असून दिनांक १४ रोजी सकाळी ७ वाजता ती राहत्या घरून अमळनेर कोलेजला येण्यास निघाली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता घरात ठेवलेले बारा हजार रुपये सदर मुलीच्या आजोबांना दिसून न आल्याने त्यांनी नातीला विचारण्यासाठी फोन केला असता तिचा मोबाईल बंद असल्याचे समजले. नातेवाईकांनी कॉलेजला जावून तिचा तपास केला असता ती कॉलेजला पोहचलीच नसल्याचे आढळून आले. शहरातील कॅमेरे चेक केले असता ती रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे दिसून आले मात्र तिचा तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत अज्ञात इसमाने फुस लावून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ जयंत सपकाळे करीत आहेत.