जळगाव मिरर । २० जानेवारी २०२३ ।
देशात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असतानाच हि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात हि प्रेम प्रकरण होत असल्याचे लक्षात आले आहे. अशीच एका धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. आपल्या सख्या तीन वर्षाच्या मुलीला आईने प्रियकराच्या मदतीने संपविले आहे. या घटनेमुळे राज्यासह देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत.
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात एका आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांच्या चौकशीत खुनाचा आरोप असलेल्या आईने गुन्हा मान्य केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात महिला आणि तिच्या प्रियकराने केलेल्या कुचराईनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
हा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. मृतदेह चालत्या ट्रेनमधून कालव्यात फेकून दिल्याच सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यावेळी मुलीचा मृतदेह रेल्वे रुळावरच पडला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवून महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांच्या चौकशीत महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,’एका विवाहित महिलेला आणि तिच्या प्रियकराला गुरुवारी आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह चालत्या ट्रेनमधून फेकून लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सुनीता आणि सनी उर्फ मालता अशी तिच्या मुलीची गळा आवळून हत्या करणारी महिला आणि तिच्या प्रियकराची ओळख पटली आहे. सुनीता या महिलेला पाच मुले आहेत. ती तिचा प्रियकर सनी आणि त्यांच्या दोन मुलींसोबत श्रीगंगानगरच्या शास्त्रीनगर भागात राहते. तिचे पती तीन मुलांसह वेगळे राहतात.
‘सोमवार आणि मंगळवारी रात्री महिलेने तिची तीन वर्षांची मुलगी किरण हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रियकर सनीच्या मदतीने तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून श्रीगंगानगर रेल्वे स्थानकावर नेला. हत्येतील दोन्ही आरोपी सकाळी 6.10 वाजता ट्रेनमध्ये चढले. फतुही रेल्वे स्थानकापूर्वी कालव्यावरील पुलावर पोहोचल्यावर दोघांनी मुलीचा मृतदेह चालत्या ट्रेनमधून कालव्यात फेकण्याचा प्रयत्न केला. पण. हा मृतदेह कालव्याऐवजी रेल्वे रुळाजवळ पडला. पोलिसांनी मंगळवारी सकाळी रेल्वे रुळाजवळून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली.