चाळीसगाव : कल्पेश महाले
शहरातील हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंद पर्यंत तितूर नदीवर असलेला पुल हा कमी उंचीचा असल्याने तितूर डोंगरी नदीला पावसाळ्यात पूर आल्यास नदीपलीकडील अर्ध्या गावाचा संपर्क तुटून जातो व शहराच्या घाट रोड वरील भागातील जनजीवन विस्कळीत होते. म्हणून तितूर नदीवर जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा पुल बनविण्यात यावा तसेच चामुंडामाता मंदिराजवळील डोंगरी नदीवरील जुना पुल जीर्ण झाला असून तेथे नविन बांधावा अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे रयत सेनेच्या वतीने दि १ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की शहरातील हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंद पर्यंत तितूर नदीवर असलेला पुल हा कमी उंचीचा असल्याने तितूर डोंगरी नदीला पावसाळ्यात पूर आल्यास नदीपलीकडील अर्ध्या गावाचा संपर्क तुटून जातो व शहराच्या घाट रोड वरील भागातील जनजीवन विस्कळीत होते त्यामुळे घाट रोड पलीकडील नागरिकांना तहसील कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, रुग्णालयात आदी भागात येणे बंद होते. अशा परीस्थितीत जर एखाद्या नागरिकांना प्रकृतीची समस्या उदभविल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होते. शहराच्या मुख्य परीसरात सर्व रुग्णालय आहेत. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, शाळा महाविद्यालय देखील याच भागात असल्यामुळे घाट रोड परीसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना तितूर नदीला आलेल्या पुरामुळे मुख्य शहरात येण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंद पर्यंत तितूर नदीवर चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने नविन पुल बांधण्यात यावा जेणेकरून नदीपलीकडील नागरिकांचा संपर्क शहराच्या मुख्य भागाशी राहील. जर पुलाचे काम सुरु केल्यास पर्यायाने वाहतूक हिरापूर रोडवरून तिरंगा पुल ते चामुंडामाता मंदिर जवळील पुलावरून वळवावी लागते मात्र चामुंडामाता मंदिराजवळ असलेला पुल हा जुना व जीर्ण झाल्याने त्यावरून अवजड व सतत वाहतूक झाल्यास तो पुल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून हॉटेल दयानंद ते हॉटेल सदानंद पर्यंत तितूर नदीवर पुल बांधण्याअगोदर पाटीलवाडा रिंगरोड चामुंडामाता मंदिराजवळील डोगरी नदीवरील पुल जीर्ण झाल्यामुळे तो नविन बांधण्यात यावा त्यामुळे घाट रोडवरील वाहतूक या रोडने वळविण्यास वाहतूक प्रशासनाला सोयीचे होईल म्हणून लवकरात लवकर चामुंडामाता मंदिराजवळील डोगरी नदीवरील पुल नवीन बांधण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव नगरपरिषदेकडे करण्यात येत आहे. केलेली मागणी लोकहितासाठी असून येत्या १ महिन्यात रिंग रोड येथील डोगरी नदीवरील पुल नवीन बांधण्यात यावा अन्यथा रयत सेनेच्या वतीने रिंग रोड वरील पुलाचे भुमिपूजन करून आंदोलन करण्यात येइल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगर परिषदेचे मुख्याधिकारी व न. पा. प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे.चाळीसगाव नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना रयत सेनेच्या वतीने दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनाच्या प्रत चाळीसगाव विधानसभेचे आमदार,जळगाव मतदारसंघाचे खासदार यांना पाठविण्यात आले आहेत,निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर कोल्हे, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील , प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, दिनेश चव्हाण,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार ,भरत नवले शहराध्यक्ष छोटू अहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर संघटक दीपक देशमुख, ज्ञानेश्वर सोनार ,रोहित गायकवाड ,श्रीकांत तांबे, किरण शेवरे, शिवाजी गवळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत