जळगाव मिरर | १२ सप्टेबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापले असून नुकतेच शिंदे गटाचे नेते आ.संजय शिरसाठ यांनी घणाघात केला आहे.
आ.संजय शिरसाट म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने जसे खेळवले आणि शेवटपर्यंत आघाडी केलीच नाही त्याच पद्धतीने आता खेळी केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पुढे बोलताना म्हणाले की, केवळ आपली मुस्लिम समाजाची मते पुन्हा कायम ठेवण्यासाठी आघाडीची बोलणी करत असल्याचे दाखवत आहे. शिरसाट यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर टीका केली.
संजय शिरसाट म्हणाले की, एमआयएमच्या वतीने जी ऑफर महाविकास आघाडीला देण्यात आली आहे, त्या बैठका कुठे घेण्यात आल्या हे गुपीते न बाळगता त्यांनी सर्व काही जाहीर करून टाकावे. उगाच काही लपविण्याचा प्रयत्न करू नये. लोकसभा निवडणुकीत जागावाटप करण्यात बराच वेळ गेला होता. उशीर झाल्यामुळे त्या उमेदवाराला प्रचार करण्यास वेळ देखील कमी मिळाला. मात्र आता महायुतीमध्ये ज्या जागेवर वाद नाहीत त्या ठिकाणचे उमेदवार माहिती म्हणून घोषित केले जाणार आहेत. त्या संदर्भात महायुतीमध्ये चर्चा करण्यात आली असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरतीसाठी सरन्यायाधीश यांच्याकडे गेल्या बाबत संजय राऊत यांच्या टीकेवर विचारले असता राऊत हे मूर्खांच्या नंदनवनात वावरत असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे.
